Food License (FSSAI License)-MG Mahaseva

fssai license, food license, mg mahaseva, xerox and typing center

नमस्कार,

         MG महासेवा आपल्या ग्राहकांना देत असलेल्या सेवांपैकी फुड लायसेन्स  (FSSAI)  ही एक सेवा आहे.


         ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जाताता किंवा त्यांची विक्री केली जाते त्या सर्व व्यवसायांना फुड परवाना म्हणजेच FSSAI लायसन्स बंधनकारक आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापना करण्यात आले आहे.


        अन्न व्यवसाय सुरु करण्यासाठी FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणी आवश्यक असते. FSSAI परवानाचे तीन प्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे-


FSSAI परवानाचे प्रकार:

  • FSSAI नोंदणी:

                    ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना FSSAI नोंदणी आवश्यक आहे.

  • FSSAI State License:

                  ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आणि 20 कोटीपर्यंत आहे त्यांना FSSAI State License आवश्यक आहे.

  • FSSAI Central License:

              ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना FSSAIf Central License आवश्यक आहे.

 

FSSAI परवानाचे फायदे:

  • अन्न व्यवसाय अनेक कायदेशीर लाभ मिळू शकतात
  • ग्राहकमध्ये तुम्हच्या व्यवसायाविषयी जागरुकता निर्माण होते.
  • FSSAI च्या लोगोमुळे ग्राहकांच्या मनात तुमच्या व्यवसायाविषयी विश्वास निर्माण होतो.
  • व्यवसाय विस्तार करण्यास एक मोठी संधी मिळते.

 FSSAI परवानाचे काळावधी:

        FSSAI परवानाचा काळावधी 1 ते 5 वर्षे असतो. तुम्ही कमीत कमी 1 वर्षासाठी किंवा जास्तीत जास्त 5 वर्षाकरीता फुड लायसेन्स काढु शकता.

 

FSSAI परवाना कसे काढु शकता?

            ग्राहक स्वत: FSSAI च्या अधिकृत वेबसाईट https://foscos.fssai.gov.in वर जाऊन काढु शकतो. अन्यथा घर बसल्यासुध्दा आमच्यामार्फत आपल्या व्यवसायाचे FSSAI परवाना काढू शकतो. त्यामुळे तुम्हाला आमच्या शॉपला भेट देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या व्हॉटसॲपद्वारे आवश्यक कागदपत्रे आणि आमची सर्विस फी भरुन आपल्या व्यवसायाचे FSSAI परवाना काढू शकतो.

FSSAI परवाना काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे-

  • आधारकार्ड
  • एक फोटो
  • सही
  • ग्रामपंचायत/नगरपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC)
  • पॅनकार्ड
  • इतर माहिती:
      • व्यवसायचे नाव/ व्यक्तीचे  नाव
      • व्यवसायाचा प्रकार
      • व्यवसायाचा पत्ता
      • मोबाईल नंबर
      • ईमेल
      • व्यवसाय चालू केल्याचा दिंनाक
      • विक्री किंवा बनवणा-या पदार्थांची यादी
      • FSM No. (असल्यास)

            वरील प्रमाणे आपण आम्हाला कागदपत्रे आणि माहिती व्हॉटसॲपद्वारे पाठवून आपल्या व्यवसायाचे FSSAI परवाना घरबसल्या काढु शकता आणि आमच्या या सेवेचा लाभ घेवू शकता.

  • आमच्या शॉपचा पत्ता:

MG महासेवा, शॉप नं. 3, MRS प्लॉझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- 415612.

      तसेच अधिक माहितीकरीता आम्हाला संपर्क करुन आपल्या व्यवसायाचे FSSAI परवाना काढू शकता आणि आम्हाला आपली सेवा करण्याचा लाभ देवू शकता.


Post a Comment

0 Comments