E-Shram Card-MG Mahaseva

esharam card, mgmahaseva, xerox and typing center

नमस्कार,

MG महासेवा आपल्या ग्राहकांना देत असलेल्या सेवांपैकी ई श्रमिक कार्ड  (E-Shram Card)  ही एक सेवा आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारनं एक पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यास असंघटित क्षेत्रातील कामगाराला 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकणार आहे. आतापर्यंत देशभरातल्या 25 कोटींहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केल्याचं भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं म्हटलं आहे.

 

ई श्रमिक कार्डचे फायदे

  • असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.
  • सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल.
  • सरकारा असंघटित कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा त्यांनाच होईल.
  • हे कार्ड तयार केल्यास असंघटित कामगारांना सरकारकडून १ वर्षासाठी विमा मोफत दिला जाईल.
  • तसेच असंघटित कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचारधीन आहे.

ई श्रमिक कार्ड कोण बनवू शकतो?

  1. घरकाम करणाऱ्या महिला
  2. रस्त्यावरील विक्रेते
  3. दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी
  4. ऑटो चालक
  5. शिलाई मशिन कामगार
  6. न्हावी कामगार
  7. आशा वर्कर/अंगणवाडी सेविका
  8. सुतारकाम करणारी व्यक्ती
  9. पेंटर, प्लंबर  कामगार
  10. इलेक्‍ट्रीशियन
  11. ब्यूटी पार्लर
  12. हॉटेल चालक
  13. प्रिंटिंग काम करणारी व्यक्ती
  14. भाजी विक्रेते
  15. लोहार
  16. सुरक्षा कमी
  17. विटभट्टी कामगार
  18. लेदर कामगार
  19. फळ विक्रेते
  20. बचत गट महिला
  21. हातगाडा कामगार
  22. वृत्तपत्र विक्रेते
  23. विडी कामगार
  24. सेंट्रिंग कामगार
  25. बांधकाम कामगाार
  26. पशुपालक करणारे
  27. लहान व सिमांत शेतकरी/शेतमजुर
  28. मच्छीमार
  29. सॉ-मिल कामगार
  30. मीठ कामगार
  31. विणकर
  32. लेबलींग व पँकीग करणारे

 ई श्रमिक कार्ड कसे काढु शकता?

ग्राहक घर बसल्यासुध्दा आमच्यामार्फत आपले ई श्रमिक कार्ड काढू शकतो. त्यामुळे त्याला आमच्या शॉपला भेट देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या व्हॉटसॲपद्वारे आवश्यक कागदपत्रे आणि आमची सर्विस फी भरुन आपले ई श्रमिक कार्ड काढू शकतो.

ई श्रमिक कार्ड  काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे-

  • आधारकार्ड
  • आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक
  • पॅनकार्ड (असल्यास)
  • बँक पासबुक
  • इतर माहिती - मोबाईल नंबर, ई मेल, कामाची  माहिती  इ.

        वरील प्रमाणे आपण आम्हाला कागदपत्रे आणि माहिती व्हॉटसॲपद्वारे पाठवून आपले ई श्रमिक कार्ड  घरबसल्या काढु शकता आणि आमच्या या सेवेचा लाभ घेवू शकता.

  • आमच्या शॉपचा पत्ता:

MG महासेवा, शॉप नं. 3, MRS प्लॉझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- 415612.

      तसेच अधिक माहितीकरीता आम्हाला संपर्क करुन आपले ई श्रमिक कार्ड काढू शकता आणि आम्हाला आपली सेवा करण्याचा लाभ देवू शकता.

 

Post a Comment

0 Comments