नमस्कार,
MG महासेवा आपल्या ग्राहकांना देत असलेल्या सेवांपैकी जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Validity Certificate) चा फॉर्म भरणे ही एक सेवा आहे.
जात प्रमाणपत्र
पडताळणी (Caste Validity Certificate) अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे :
- अर्जदाराचा मुळ जातीचा दाखला.
- अर्जदाराच्या मुळ जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (Attested Photo Copy of Cast Certificate)
- अर्जदाराचा प्राथमिक / माध्यमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला (सत्यप्रत )
- अर्जदाराच्या वडिलांचा प्राथमिक / माध्यमिक शाळेता शाळा सोडल्याचा दाखला (सत्यप्रत)
- अर्जदाराचे वडिलांना सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला (सत्यप्रत )
- सख्खे चुलते/आजोबा/पणजोबा / सख्खी आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला (सत्यप्रत )
- अर्जासोबत अर्जदार / पालक यांनी अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे रात्य असलेवावत आणि नातेसंबंध जुळण्याकरिता रक्तसंबंधातील (वडीलांचेकडील) वंशावळ यावावत रू.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र करणे बंधनकारक आहे.
- इतर महसुली पुरावे उदा. :- गांव नमुना नंबर १४ (जन्म-मृत्यु नोंदीचे उतारे), सातबारा, फेरफार उतारा, महसुली दस्तऐवजातील नोंदी इ. पुरावे. वंशावळ सिध्द करणारी कागदपत्रे आवश्यक. शासनाने मागासवर्ग प्रवर्गासाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासाच्या संदर्भात संवर्गनिहाय मानीव दिनांक पुढीलप्रमाणे आहेत: (महाराष्ट्र राज्यातील वंशपरंपरागत /वडीलोपार्जित प्रदीर्घ काळचे कायमस्वरूपी वास्तव्य खालील संवर्गनिहाय नमुद तारखांच्यापूर्वीचे असणे आवश्यक) अनुसूचित जातीसाठी दिनांक १० ऑगस्ट १९५० पूर्वीचे.
- विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी दिनांक २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वीचे.
- इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी दिनांक १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे
- सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास प्रवर्गासाठी दिनांक १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे
अन्य राज्यातून मानीव दिनांकापूर्वी महाराष्ट्रात आले असल्यास महाराष्ट्र राज्याच्या सवलती मिळतात. मानीव दिनांकानंतर आले असल्यास मूळ राज्य व केंद्र शासनाच्या सवलती मिळतात. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात जाऊन सविस्तर माहिती घ्यावी. (कृपया वरील कागदपत्रांच्या यादीपैकी फक्त मानीव दिनांकापूर्वीचे महाराष्ट्र राज्यातील वंशपरंपरागत/तडिलोपार्जित प्रदीर्घ कायमस्वरुपी वास्तव्य सिध्द करणारी कागदपत्रेच अर्जासोबत जोडावित. अनावश्यक कागदपत्रे जोडू नयेत.)
- आमच्या शॉपचा पत्ता:
MG महासेवा, शॉप नं. 3, MRS प्लॉझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- 415612.
- संपर्क:
- Email Id: mgmahaseva@gmail.com
- Call: +91 9673118580
- Whatsapp: +91 9767533249
तसेच
अधिक माहितीकरीता आम्हाला संपर्क करुन आपले जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Validity Certificate) काढू शकता आणि
आम्हाला आपली सेवा करण्याचा लाभ देवू शकता.