Shop Act License - MG Mahaseva

Shop Act license-MG Mahaseva

 नमस्कार,

            MG महासेवा आपल्या ग्राहकांना देत असलेल्या सेवांपैकी दुकान कायदा परवाना (Shop Act license) ही एक सेवा आहे.

        दुकान कायदा परवाना (Shop Act license) म्हणजे आपल्या व्यवसायाची नोंदणी प्रमाणपत्र असते. सर्वसाधारणपणे दुकान सुरू केल्यानंतर दुकान आणि आस्थापना कायद्याअंतर्गत राज्य शासनाच्या कामगार विभागात आपल्या दुकानाची नोंदणी करावी लागते. भारतातील बहुतेक व्यवसायांच्या अधीन असलेल्या महत्वपुर्ण नियमांपैकी म्हणजे दुकान आणि आस्थापना कायदा (Shop Act) जो भारतातील प्रत्येक राज्यात लागू केला आहे. हा कायदा मजुरी, कामाचे तास, रजा,सेवेच्या अटी आणि इतर कामांच्या अटींचे नियमन करण्यासाठी लागू केला आहे.

दुकान कायदा परवाना (Shop Act license) काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-

  • आधारकार्ड
  • एक फोटो
  • सही
  • ग्रामपंचायत/नगरपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC)
  • पॅनकार्ड
  • दुकान भाडयाने घेतले असेल तर भाडेकरार किंवा स्वत:चा असल्यास करपावती
  • मराठीमध्ये नाव असलेले दुकानाचा बाहेरील व आतील फोटो
  • इतर माहिती:
      • व्यवसायाचे नाव/ व्यक्तीचे  नाव
      • व्यवसायाचा प्रकार
      • व्यवसायाचा पूर्ण पत्ता
      • व्यवसाय चालू केल्याचा दिंनाक
      • मोबाईल नंबर
      • ईमेल
      • कामगारांची संख्या (पुरुष आणि महिला)

         वरील प्रमाणे आपण आम्हाला कागदपत्रे आणि माहिती व्हॉटसॲपद्वारे पाठवून आपल्या व्यवसायाचे दुकान कायदा परवाना (Shop Act licence) घरबसल्या काढु शकता आणि आमच्या या सेवेचा लाभ घेवू शकता.


  • आमच्या शॉपचा पत्ता:

MG महासेवा, शॉप नं. 3, MRS प्लॉझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- 415612.

      तसेच अधिक माहितीकरीता आम्हाला संपर्क करुन आपल्या व्यवसायाचे दुकान कायदा परवाना (Shop Act licenses) काढू शकता आणि आम्हाला आपली सेवा करण्याचा लाभ देवू शकता.

x

Post a Comment

0 Comments