Pancard-MG Mahaseva

Pancard-MG Mahaseva

 नमस्कार,

        MG महासेवा आपल्या ग्राहकांना देत असलेल्या सेवा पैकी पॅनकार्ड काढणे ही एक सेवा आहे. ज्यामध्ये आम्ही दोन प्रकारे ग्राहकांना पॅनकार्ड काढून देतो. म्हणजेच ज्या ग्राहकांकडे पॅनकार्ड नाही अशा ग्राहकांनी  नवीन पॅनकार्ड काढण्यासाठी आमच्याकडे अर्ज करावा. ज्या ग्राहकांना पॅनकार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मदिनांक, लिंग, फोटो, सही, मोबाईल व इमेल आयडी इ. मध्ये बदल करावयाचा असल्यास किंवा पॅनकार्ड हरवले असेल तर सदर पॅनकार्ड काढण्यासाठी त्यांनी आमच्याकडे करेक्शनसाठी अर्ज करावा.

            आम्ही योग्य दरामध्ये अचुकरित्या आपल्याला पॅनकार्ड काढून देतो. हे दोन्ही पॅनकार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे-

  •  नविन पॅनकार्ड :-

नविन पॅनकार्ड हे आपल्याला दोन प्रकारे काढता येते. ज्यामध्ये रेगुलर आणि अर्जंन्ट पॅनकार्ड यांचा समावेश होतो. रेगुलर पॅनकार्ड हे आपल्याला 20 ते 25 दिवसांमध्ये पोष्टाद्वारे आपल्या घरी येते तर अर्जंन्ट पॅनकार्ड आपल्या 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर मिळते. तसेच हार्डकॉपी तुम्हाला 7 ते 10 दिवसात पोष्टाने तुमच्या घरी येते. तसेच या दोन्ही पॅनकार्डला लागणारी कादपत्रे व इतर माहिती पूढील प्रमाणे-

                 रेगुलर पॅनकार्ड:

      • पॅनकार्ड अर्ज
      • आधार कार्ड
      • दोन फोटो
      •  सही
      • मॅरेज सर्टिफिकेट (जर महिलेचे लग्न झाले असल्यास)
      • इतर माहिती- मोबाईल नंबर, ईमेल आयडी, वडिलांचे पूर्ण नाव.
                अर्जंन्ट पॅनकार्ड:
      • आधार कार्ड
      • आधारकार्ड मोबाईल नंबर लिंक
      •  इतर माहिती- मोबाईल नंबर, ईमेल आयडी, वडिलांचे पूर्ण नाव.

  •  करेक्शन पॅनकार्ड:
      •  पॅनकार्ड अर्ज
      • आधारकार्ड
      • सहि
      • जुन्या पॅनकार्डची झेरॉक्स
      • मॅरेज सर्टिफिकेट / गॅजेट (नावात बदलाकरिता)

 

            वरील प्रमाणे नवीन पॅनकार्ड व करेक्शन पॅनकार्ड काढण्याठी पॅनकार्डचे अर्ज भरून घेत असताना आपल्या सहीची आवश्यकता असते त्यामुळे हे दोन्ही पॅनकार्ड काढताना तुम्हाला आमच्या शॉपला भेट दयावी लागेल. मात्र जर तुम्हाला अर्जंन्ट पॅनकार्ड हवे असल्यास तुम्हाला आमच्या शॉपला भेट देण्याची आवश्यकता लागत नाही. तुम्ही व्हॉटसॲप द्वारे सदर पॅनकार्ड काढून घेवू शकता.

      • आमच्या शॉपचा पत्ता:

MG महासेवा, शॉप नं. 3, MRS प्लॉझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- 415612.

      तसेच अधिक माहितीकरीता आम्हला संपर्क करुन आजच आपले पॅनकार्ड काढुन घ्या आणि आम्हला आपली सेवा करण्याचा लाभ दया.

 

Post a Comment

0 Comments